mahalakshmi-saras-yatra
 

हिरवळ दिलासा संस्थेमार्फ़त महालक्ष्मी सरस मुंबई यात्रा संपन्न
ग्रामीण विकास मंत्रालय केंद्रशासन, ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यामाने बचत गटांच्या उत्पादनांसाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री २०१०-११ भव्य उदघाटन समारंभ व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण समारंभ २१ जानेवारी २०११ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला.
सदर प्रदर्शनाला भेट व समारंभासाठी महाड तालुक्यातून हिरवळ दिलासा संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने ५६ महिलांना नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
महाड तालुक्यातील साधारण चाळीस बचत गटातील महिलांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध प्रांतातून, राज्यांतून आपला माल विकण्यासाठी एवढ्या दूरवर आणलेला पाहून आपणहि यापुढे या प्रदर्शनाचा लाभ उठवायचा असा अनेक महिलांनी निर्धार केला. केवळ आपलं घर सांभाळणाऱ्या महिलांनी बचत गटांच्या माध्यामातुन घरगुती प्रकारची कित्येक उत्पाद्ने आपणहि बनवू शकतो यांचा त्यांना प्रत्यय आला.
सदर प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ग्राम सेवा संघाच्या अनेक महिलांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे पंचायत समिती महाडचे विस्तार अधिकारी श्री. ठोंबरे हिरवळ दिलासा संस्थेचे तालुका समन्वयक संपत पाटील, विभागीय समन्वयक कमलेश लोटावे, मधुमती पाटील यांनी खूप मेहनत घेतली. नडगाव संघाच्या अध्यक्षा नीता मांडे, सारवट संघाच्या अध्यक्ष निर्मला पिसाळ, नेहा आंब्रे, भारती शिंदे, चंद्राबाई, विद्या पवार, अपर्णा पवार, नंदा मोरे, कल्पना पवार, अपर्णा कालगुडे, सपना येरूणकर या ग्रामसंघाच्या हिरकणींनी प्रवासात गाणी, भजन व हरिपाठाच्या माध्यामातून महिलांचे खुप मनोरंजन व प्रबॊधन केले.

 
 
 


Gurukul Academy College of Computer Science & Information Technology Hirwal Pratishthan
E-mail: dilasa@hirwal.com
Visit us on Facebook... Visit us on YouTube...
Copyright © Hirwal Dilasa 2012, All Rights Reserved
Best viewed in 1024 x 768 resolution. Web Design and Developed by : Pristinemultimedia.com
Gurukul Academy College of Computer Science & Information Technology Hirwal Pratishthan