|
हिरवळ दिलासा संस्थेमार्फ़त जाणीव जागृती कार्यक्रमाची मोहोत येथून सुरूवात
वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जाणीव जागृती कार्यक्रमाचा शुभारंभ महाड तालुक्यातील मोहोत ग्रामपंचायतीपासुन झाला. हिरवळ दिलासा संस्था म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
या कार्यक्रमाला मोहोत-वडघर भागातील शेतकरी महिला बचत गटातील सदस्य यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मोहोत येथील श्री. काळभैरव मंदिरात या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवर शेखर गजभिये, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक यांच्याहस्ते श्री काळभैरव देवाला पुष्पहार घालुन या कार्यक्रमाला एक वेगळे स्वरुप आणले. उपस्थितांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या या
कार्यक्रमाला हिरवळ संस्थेचे प्रकल्प प्रमुख सीताराम सुंदर कडु यांनी सविस्तर पाणलोट विषयाची ओळख करून दिली. अशा कार्यक्रमाला लोकांचा मिळणारा सहभाग हा महत्त्वाचा आहे व योग्य अपेक्षित सहभाग मिळल्यास हिरवळ दिलासा संस्थेतर्फ़े किशोरभाई धारिया यांना आदर्श गावात मोहोत या गावाचा सहभाग करायला आवडेल असे आवर्जून सीताराम कडू यांनी सांगितले. पाणलोट व्यवस्थापन हा कार्यक्रम लोकांसाठी, लोकांनी राबविलेला व नियंत्रित केलेला असावा. यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली असे जिल्हा प्रशिक्षण समन्वयक श्री. गजभिये यांनी सांगितले व लोकांचा सहभाग पाहुन त्यांना खात्री झाली की, लोकांना पाणलोट व्यवस्थापन उपस्थित राहण्यास मनापासून आवडते.
कार्यक्रम करण्यासाठी मोहोत पाणलोट समितीचे अध्यक्ष दिलीप दळवी, सचिव तुकाराम गुडेकर व इतर सदस्य यांनी सहकार्य केले. तसेच आदर्श शेतकरी बबन मोरे, माजी सरपंच संदिप गायकवाड, उपसरपंच अनिल चौधरी, जेष्ठ नागरिक कृष्णा उपस्थित होते. |
|
|
|