ekatmik-panlot-vyavasthapan
 

हिरवळ दिलासा संस्थेमार्फ़त पाणलोट प्रकल्पाचे क्षमता बांधणी चर्चासत्र संपन्न
वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत' क्षमता बांधणी चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात सहभागी मान्यवरांचे हिरवळ संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोरभाई धारीया, पाणलोट प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुख तालुका कृषी अधिकारी श्री. नवले., डीआरओ चे प्रमुख रोह कॄषी विज्ञान केंद्राचे श्री. तलाठी, पोलादपूर तालुका कृषी अधिकारी श्री काकडे तसेच कृषी अधिकारी कांबळे उपस्थित होते. या चर्चासत्रात महाड - पोलादपुर तालुक्यातील पाणलोट समुह क्र. १,२,३ व अन्य समुहाचे सचिव व अध्यक्ष बहुसंख्येने उपस्थित होते. चर्चासत्रात प्रास्ताविक हिरवळ संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. सिताराम सुंदर कडू यांनी केले. मान्यवरांचे स्वागत किशोरभाई धारीया यांनी केले. संस्थेच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सर्व सचिव व अध्यक्षांना एकजुटीने कार्यात सहभागी होण्यास आवाहन केले व महाड - पोलादपूर तालुक्याची विकासाची किल्ली तुमच्या हातात आहे, तर त्याचा उपयोग करा व याकामी हिरवळ संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहाय्य मिळेल. अशी ग्वाही दिली. तालुका कृषी अधिकारी नवले यांनी सर्व सचिव यांना महत्त्वाची भूमिका बजावतानाच कर्तव्याची जबाबदारी पार पाडताना कसूर केल्यास सचिव पद गमावले जावु शकते. पोलादपूर कृषी अधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला समारोप कमलेश कोरपे यांनी केले.

 
 
 


Gurukul Academy College of Computer Science & Information Technology Hirwal Pratishthan
E-mail: dilasa@hirwal.com
Visit us on Facebook... Visit us on YouTube...
Copyright © Hirwal Dilasa 2012, All Rights Reserved
Best viewed in 1024 x 768 resolution. Web Design and Developed by : Pristinemultimedia.com
Gurukul Academy College of Computer Science & Information Technology Hirwal Pratishthan