arogya-shibir
 

मोफ़त आरोग्य शिबिर

        ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा अपुरी मिळत असल्याने रूग्णांना शहरामध्ये उपचार घेण्यासाठी जावे लागते. सेवाभावी संस्था ग्रामीण भागात मोफ़त शिबिराचे आयोजन करीत असतात. त्याचा लाभ ग्रामीण नागरिकांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महाड मॅन्युफ़ॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भोसले यांनी केले. निमित्त होते हिरवळ दिलासा संस्था आणि सवाणे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शेलटोलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफ़त आरोग्य शिबिराचे.

        शिबिर प्रमुख आणि महडामधील शल्यचिकित्सक डॉ. रमेश नाईक यांनी शिबिराची माहिती सांगताना ग्रामीण भागातील रुग्णांना आजारपणामध्ये उपचार घेणे अशक्य होते. त्याचे अचूक निदान करण्यासाठी खर्च देखील अधिक होतो, सहकार्याने परिसरतील गावामध्ये मोफ़त शिबीर भरविण्यात आल्यामुळे ग्रामीण जनतेस त्याचा लाभ झाला आहे असे मत सदर प्रसंगी व्यक्त केले. सदर मोफत आरोग्य शिबिरामध्ये महाडमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुद्रिमोती, दंतरोग तज्ज्ञ डॉ. खाजगीवाले, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रानडे, डॉ. जाधव यांसारख्या सुप्रसिद्ध तज्ज्ञ वैद्यांनी परिसरातील रुग्णांची तपासणी केली.

        शेलटोलवासियांनी असे परिपूर्ण आरोग्य शिबिर भरविल्याबद्दल हिरवळ दिलासाचे आभार मानतानाच अशी आरोग्य शिबिरे अजुन भरविण्यात यावीत अशी इच्छा आयोजकांकडे व्यक्त केली.

 
 
 


Gurukul Academy College of Computer Science & Information Technology Hirwal Pratishthan
E-mail: dilasa@hirwal.com
Visit us on Facebook... Visit us on YouTube...
Copyright © Hirwal Dilasa 2012, All Rights Reserved
Best viewed in 1024 x 768 resolution. Web Design and Developed by : Pristinemultimedia.com
Gurukul Academy College of Computer Science & Information Technology Hirwal Pratishthan